Tag Archives: Pm Kusum Solar pump yojna

pm kusum yojana : पीएम कुसुम योजनेची अंतिम पात्र यादी आली-लगेच करा हे काम

pm kusum yojana – सोलर पंप पाहिजे असल्यास करावे लागणार हे काम

शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हि अतिशय महत्वाची अपडेट आहे.कारण आता लवकरच pm kusum yojana चा सोलर पंप तुम्हाला मिळणार आहे.कारण आता अंतिम पात्र यादी जाहीर झाली आहे व पुढील काम आता तुम्हाला करावयाचे आहेत.नेमकी काय अपडेट आहे? हेच आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर जर अशाच नवीन अपडेट व योजना थेट मोबाइलला वर जर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

कुसुम सोलार पंप योजनेसाठी महाराष्ट्र मधून लाखो शेतकरी बांधवांनी अर्ज भरलेला आहे आणि आता ते शेतकरी बांधव पुढील कार्यवाहीच्या प्रतीक्षेमध्ये होते.आता तुमची प्रतीक्षा संपली आहे.आता योजनेच्या याद्या फायनल झालेल्या आहेत.

कुसुम सोलार योजनेच्या अंतर्गत मागील काही महिन्यापासून अर्ज भरणे सुरू होते. त्याचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी अर्ज भरून घेतले जात होते आणि त्यानंतर आता पुढील प्रक्रिया म्हणजे तुमच्या अंतिम याद्या
प्रकाशित झाल्या आहेत.आणि याद्या फायनल झाल्याच्या नंतर काही शेतकरी बांधवांचे अर्ज त्रुटीमध्ये येऊ शकतात.ज्यांचे अर्ज व्यवस्थित असतील तर त्यांना पेमेंट ऑप्शन दिले जातील.

अंतिम पात्र यादी कुठे प्रसिद्ध होणार ? पुढे काय करायचं?

शेतकरी बांधवांनो आता तुमच्या जिल्हा कार्यालय,प्रत्येक जिल्ह्याचे मेडा कार्यालयांच्या माध्यमातून ह्या याद्या अंतिम पात्र झाल्या आहेत. व आता यानंतर याद्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जातील. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव आहे, या यादीमध्ये नाव असलेले शेतकरी सेल्फ सर्वे ऑप्शन साठी पात्र होणार आहेत.

शेतकरी बांधवानो, सेल्फ सर्वे झाल्या नंतर तुमचे पेमेंट ऑपशन एनेबल होईल सोबतच तुम्हाला कंपनी निवडायची संधी उपलब्ध होईल.तुम्हाला ज्या कंपनीचे पंप निवडायचे ते निवडता येईल.मात्र आता बऱ्याच शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

योजनेची प्रक्रिया करून देणाऱ्या मध्यस्थी व दलाला पासून सावधान

कारण काही मध्यस्थी ब्रोकर लोक किंवा दलाल किंवा कंपनीच्या मार्फत देखील वेंडर सिलेक्शन करण्यासाठी त्या कंपनीच्या मार्फत शेतकरी बांधवांना कॉल केले जातात.कारण त्यांच्याकडे डिटेल्स असतात आणि त्यांच्यामार्फत सांगितलं जातं की “आम्ही तुम्हाला पेमेंट ऑप्शन आणून देऊ किंवा तुमचा सेल्फ सर्व करू किंवा इतर काही प्रोसेस करू” अशा माध्यमातून त्यांना पैशाची मागमी देखील केली जाते.

अतिवृष्टीची मदत खात्यात येणार पण करावे लागणार ekyc
ekyc साठी क्लिक करा.

शेतकरी बांधवांनो जर pm kusum yojana यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पुढचा मेसेज हा ऑटोमॅटिक मिळतो हा मेसेज कार्यालयाच्या मार्फत येत असतो.कृषी विभाग कडून तुम्हाला संपर्क साधला जाईल .

तुमचे यादीमध्ये नाव आलं याचा अर्थ तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल असं नाही कारण की यामध्येही आता जिल्ह्याचा लक्षांक लक्षात घेतला जातो व त्याप्रमाणे लाभार्थ्याची अंतिम यादी रिलीज केली जाते किंवा त्याप्रमाणे प्राधान्यक्रमांना प्रमाणात लाभार्थ्यांचे नाव या यादीमध्ये दिले जाते व त्यांचे पुढचे ऑप्शन त्यांना खुले करून दिले जातात.

सेल्प सर्वे करताना हि चूक करू नका

आता पुढील हे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे.म्हणजे की तुम्हाला सर्विस ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे,म्हणजेच जिथं तुमचा पाण्याचा स्तोत्र आहे तिथेच हा सर्वे करा
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे चूक होऊ देऊ नका.

दलालाच्या माध्यमातून हा सर्वे करून घेऊ नका. कारण पुढे जाऊन तुम्हाला नाहक प्रमाणे त्रास होऊ शकतो.

कोणती कंपनी निवडावी?

Perni Anudan Yojna-२०२३ | खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान

पेरणी अनुदान योजना कशी मिळेल | Perni Anudan Yojna-२०२३

Perni Anudan Yojna-२०२३ :- नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिहंगाम १० हजार रुपये निविष्ठा अनुदान द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचा नुकसान होत आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये अतिवृष्टी होत आहे. जोरदार गारपीट देखील होत आहे तसेच अवेळी पाऊस देखील होत आहे.हेच काय तर कधी मोठा पावसाचा खंड पडतो. या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा नुकसान होतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.

Perni Anudan Yojna-२०२३

अशा परिस्थितीमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून गारपीट,अवेळी पाऊस नुकसान भरपाई,अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानिसाठी शेतकऱ्यांना एक वेळ अनुदान दिले जातात परंतु अनुदान वेळेत मिळत नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.

शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे उपलब्ध नसतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अनुदान मिळवून सुद्धा शेतीत पिकवता येत नाही.आणि याच पार्श्वभूमी या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदाना देण्यापेक्षा एक वेळचं निविष्ठ अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचे मागणे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला करण्यात आलेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना Perni Anudan Yojna-२०२३ हि योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणी,अतिवृष्टी व पाऊस खंड पडल्यास योजना कामाची

मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.त्याच बरोबर वातावरणाचं संतुलन बदलत चाललेलं आहे या सर्वाचा विचार करता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच सुद्धा संकट येऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची नापीके असेल, आत्महत्या असतील अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी,शेतकऱ्याला सफल करण्यासाठी अशा प्रकारचं जर निविष्ठ अनुदान एक वेळ दिलं तर शेतकरी या ठिकाणी दुबार पेरणी सारखा संकट आलं तरी समोर जाऊ शकतात.

खरीप,हंगाम रब्बी हंगाम अशा प्रत्येक हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून एक वेळचा अनुदान १० हजार रुपये द्यावा अशा प्रकारचा दिलासादायक एक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.

बियाणे मिळवा १००% अनुदानावर लगेच अर्ज करा -पहा नेमकी योजना आहे तरी काय ?


मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असतील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्याची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस शेतकऱ्यांकडे अनुदानाचे पैसे उपलब्ध नसतात यासर्वाचा विचार केला तर अशी सरसकट मदत जर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच शेतकरी समाधानी होईल.

Perni Anudan Yojna 2023


आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव स्वीकारला जातोय की नाही? शेतकऱ्याना हे अनुदान मिळणार कि नाही? हे सांगता येणार नाही. याची प्रक्रिया चालू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अजूनपर्यंत या बाबतचा शासन निर्णय (GR) आलेला नाही.मित्रांनो 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याची योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याचे एक राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शवलेली आहे मात्र अजून हि योजना अजून सुरु झाली नाही.मात्र हि योजना अंतिम टप्य्यात असल्याचं सांगितलं जात आहे .

१० हजार अनुदान कधी? व कसे मिळणार?

शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .

शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

योजनेचा कोटा वाढला-पहा सविस्तर बातमी- आता सर्वच शेतकऱ्याना मिळणार सोलार पंप

सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .या अनुदानाची पुढील प्रक्रिया नेमकी कशी असेल हे अजून पर्यंत स्पष्ट करण्यात आले नाही त्यामुळे हि योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्याना online फार्म भरावा लागेल कि ofline अर्ज करून हे अनुदान मिळेल हे सांगता येणार नाही तेव्हा आमच्या सोबत जोडून राहा शेती विषयक व योजना लगेच तुमच्या मोबाइलला वर मिळवा.

कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोठा आला | kusum solar pump yojana 2023 new update

kusum solar pump yojana 2023-५० हजाराचा नवीन कोठा आला | वेबसाइट झाली सुरु लगेच अर्ज करा

kusum solar pump yojana 2023 new update : नमस्कार शेतकरी मित्रानो सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेचे नवनवीन अपडेट येते असतात आणि आपल्या पोर्टलच्या माध्यमातून त्या अपडेट आपल्या पर्यंत पोहचवत असतो.आज देखील शेतकरी मित्रांसाठी kusum solar pump yojna बाबत नवीन आणि महत्वाचा update आलेला आहे.कारण आता शेतकऱ्याना सोलर पंपाचा नवीन कोठा वाढून देण्यात येणार आहे?हा कोटा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे? कोणत्या प्रवर्गासाठी दिला जाणार अशी? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती,तेव्हा हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत नक्की वाचा.

kusum solar pump yojana 2023 new update

kusum solar pump yojana 2023 Maharashtra :- हा कोठा सम्पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असून खालील प्रमाणे जिल्ह्याची यादी आहे.या सर्व जिल्ह्यांना लवकरच कोठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आणि वेबसाते चा प्रॉब्लेम देखील लवकरच दूर करून महाऊर्जाची वेबसाइट लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती मिळाली आहे

kusum solar pump yojana 2023 new update | कोटा कधी मिळणार? काय आहे नवीन आपटेड ?

तुम्हाला माहित नसेल पण सोलर पंप योजनेचा खूप मोठं उद्दिष्ट असून पुढील ५ वर्षात ५ लाख पंप शेतकऱ्याना वितरित करण्यात येणार आहेत.त्यापैकी चालू असलेलं पहिलं उद्दिष्ट १ लाख कृषी पंपाचं असून .त्यापैकी फक्त ५० हजार पम्पाचा वाटप झाला आहे.आता राहिलेल्या उदिष्ठाला पूर्ण करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

खरं पहिलं तर या कृषी पंपाला शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.असा असताना आणखी एक मोठी अडचण अशी कि,काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोठा उपलब्ध आहे, मात्र तिथे शेतकऱ्याची मागणी अतिशय कमी आहे. तर काही जिल्ह्यात मागणी हजारोच्या संख्येत आहे मात्र कोटा शंभराच्या आकड्यात आहे.
याच सर्व गोष्टीचा विचार करता सरकारने असा निर्णय घेतला आहे कि,आता शेतकऱ्यांना हा कोटा वाढून मिळणार आहे .

जाणून घ्या-कुसुम सोलर पंपाची सविस्तर माहिती.अर्ज करण्याची कार्यपद्धत.

कोटा वाढून देताना ज्या जिल्ह्यात कोटा जास्त आहे मात्र मागणी खूप कमी आहे,अशा शेतकऱ्यांचा किंवा जिल्ह्याचा कोटा मागणी जास्त असणाऱ्या जिल्ह्यांना वळती करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी kusum solar pump yojana 2023 new update आनंदाची आहे.

सध्या सर्व जिल्ह्यात शेतकऱ्याकडून करण्यात आलेल्या अर्जाची स्थिती आपण टेबलच्या माध्यमातून समजून घ्या.

जिल्हामागणी
रत्‍नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे,रायगड1
औरंगाबाद779
नाशिक1769
बीड 696
भंडारा 420
परभणी731
अहमदनगर1419
नागपूर 30
अकोला 272
नांदेड 952
अमरावती 61
नंदुरबार1036
बुलढाणा735
पुणे2602
चंद्रपूर 20
धुळे 1233
गडचिरोली54
सांगली1820
गोंदिया94
सातारा1369
हिंगोली 907
यवतमाळ1140
धाराशिव500
जळगाव896
सोलापूर1450
जालना 919
कोल्हापूर 158
वर्धा2
लातूर826
वाशिम773
पालघर8

सोलर पंप फक्त 5 हजार रुपयात -pm Kusum Solar yojna शेतकऱ्यांसाठी 95 % सबसिडी |

5 हजारात कसा मिळणार सौर पंप- Pm Kusum Solar yojna

नमस्कार शेतकरी मित्रानो, आजची शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाची योजना असून फक्त 5 हजार रुपयात सौर पंप कसा मिळणार या साठी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत तेव्हा संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या..

सोलर पंप योजना : हि योजना 08 मार्च 2019 रोजी सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेचं नाव मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजना या नावाने चालविली जात होती आता मात्र प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या नावाने चालू आहे.

हि योजना भारत सरकारच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येत असून पीएम कुसुम सोलर पंप योजना या नावाने चालविली जाते.

हे वाचा -नमो शेतकरी योजनेचे 2 हजार या तारखेला जमा होणार

हि योजना ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली चालविली जात असून . या योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे तसेच जीवाश्म इंधनावरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी करणे,शास्वत ऊर्जा प्रस्थापित करणे व हे आहे.ही योजना 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म-इंधन स्त्रोतांपासून विद्युत उर्जेच्या स्थापित क्षमतेचा वाटा 40% पर्यंत वाढविण्याच्या दिशेने पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल टाकणार आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान मिळते..हि योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून राबविण्यात येत असून दोघांचाही सबसिडीच्या 50-50 टक्के हिसा आहे. तर सबसिडी (solar pump subsidy) व्यतिरिक्त 5 किंवा 10% स्वहिस्सा शेतकऱ्यांनाच भरावा लागतो..हे आनुदान तुम्हाला कसे मिळेल हे आपण आता जाणून घेऊ..

सोलर पंप योजना (Pm Kusum Solar pump yojna) 5 हजारात कशी मिळेल ?

खरं तर हि योजना जवळजवळ शेतकऱ्यांना 90% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे अनुदान 95 टक्के आहे..आणि याच लाभार्थ्यांना हे सोलर पंप (solar pump) फक्त 5 हजार किंवा 5 टक्के किंमतीत मिळतात. या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्या व्यतिरिक्त इतरांना 90 % अनुदानावर किंवा 10% किंमतीत solar pump yojna पुरविली जाते..

कुसुम सोलर पंप योजना नोंदणी कशी कराल | kusum solar pump yojana maharashtra

चला तर आज जाणून घेऊया कोणत्याही लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन (Pm Kusum Solar yojna online apply ) कशी करायची? कुठे करायची? हे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो . हि प्रक्रिया अगदी सोपी आहे मात्र जर तुम्हालाआ यातील काहीच समजत नसल्यास आपण जवळच्या csc केंद्रावर जा ते तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करून देतील.आणि जर काय तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया स्वता करायची असेल तर खालील ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन संपूर्ण माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता

कुसुम सोलर पंप योजना नोंदणीसाठी खालील बटन क्लीक करा

सौर पंप योजनेसाठी पात्रता अटी व नियम

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभ घेण्यासाठी नियम व अटी खलील प्रमाणे आहेत

  • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा
  • तो शेतकरी असावा
  • त्याच्या नावाने शेतीचा 7/12 असावा
  • प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1)आधार कार्ड,ओळखपत्र


2) रेशनकार्ड/शिधापत्रिका


3)नोंदणीची प्रत,


4)बँक खाते. पासबुक ,


5)7/12 व 8 अ


6) शेताचा नकाशा

7) शेजाऱ्यांचे लाईट बिल

8)पासपोर्ट आकाराचा फोटो,


9)मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र?

१) शेतकरी
२) सहकारी संस्था
३) शेतकर्‍यांचा गट
४) जल ग्राहक संघटना
५) शेतकरी उत्पादक संस्था

सौर पंप किंमत | solar water pump price

सोलर पंप HPसोलर पंप किंमत
3 HP सोलर पंपकिंमत : 1,56,000
5 HP सोलर पंपकिंमत : 2,32,000
7.5 HP सोलर पंपकिंमत : 3,80,000
10 HP सोलर पंपकिंमत : 4,68,000