Land Record फक्त गट नंबर टाकून मोफत मिळवा नकाशा मोबाईल वर
Land Record :- शेतकरी मित्रानो,तुम्हाला बऱ्याच कामासाठी शेतीचा नकाशा लागतो.हा नकाशा कसा मोबाईल वर काढायचा हे सांगणार अहो.विशेष करून जर तुम्हाला शेती विषयक सरकारी योजना मिळवायची असेल तर मात्र तुम्हाला शेतीचा नकाशा लागतोच.मात्र त्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागते.
तिथे गेल्या नंतरही शेतकऱ्याला वेळेत नकाशा मिळत नाही आणि त्याच कारणाने शेतकऱ्यांना योजना मिळत नाही.बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना हा नकाशा कुठे मिळतो हेच माहित नसते.चला तर त्याबाबत सविस्तार माहिती देणार आहोत.
मात्र त्याअगोदर जर तुम्हाला अशाच योजना व शेतीविषयक योजना जर मोबाईल वर मिळवायच्या असतील तर लगेच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा .खाली ग्रुपची लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
चला शेतकरी मित्रानो,आता आपण समजून घेऊया की,आपल्याला शेतीचा नकाशा नेमका मिळतो तरी कुठे हे पाहूया.तुम्ही शेती विषयक बरेच कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात जाता.7/12 काढायचा झाल्यास तलाठी यांची भेट घेता,मग शेतीचा नकाशा तुम्हाला त्यांच्याकडे मिळणार नाही.
मित्रानो,शेतीचा नकाशा,गावाचा नकाशा,तसेच शेतीचे land record तुम्हाला फक्त भूमी अभिलेख विभाग कार्यालयात मिळतात.मात्रज्यावेळी तुम्ही हे काढण्यासाठी जेव्हा भूमी अभिलेख विभागात जातात त्यावेळी तुम्हाला खूप जास्त चकरा माराव्या लागतात व तुमच्याकडून अधिकचे पैसे देखील घेतले जातात.
त्यामुळे आता ह्या चकरा व अधिकचे पैसे वाचावा आणि थेट नकाशा आपल्या मोबाइलला वर मिळवा तोही अगदी मोफत .नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि नकाशा पहा.