Soybean pre-emergence Herbicide :- सोयाबीन पिकातील तन व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.कारण सोयाबीन पीक हे लवकर येणारे पीक आहे.त्यामुळे वेळेतच तणाचे नियंत्रण करावे लागते अन्याथा तन हे पिकासोबत स्पर्धा करून पिकाच्या वर जाते व पिकात लक्षणीय घट होते त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये तनाचा बंदोबस्त करण्यासाठी बाजारामध्ये दोन प्रकारचे रासायनिक तणनाशके हे उपलब्ध आहे.
त्यामध्ये पहिलं तननाशक आहे ते म्हणजे उगवणी पूर्वीचे तणनाशके आणि दुसरं जे आहे ते म्हणजे उगवणीनंतरची तणनाशके. या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकावर शिफारशी केलेली तन नाशके त्यांचे वापरायचे प्रमाण आणि ते कधी वापरायचे त्याची वेळ याविषयी माहिती घेणार आहोत.
तणनाशक फवारताना ह्या चुका करू नका-नाहीतर फायदा होणार नाही
नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतातील तण हे गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्याची डोकेदुखी बनली असून .तणनियंत्रणासाठी शेतकर्याचा मोठा खर्च वाढला आहे.मात्र हा शेतकऱ्यांचा पैसा व्यर्थ जात आहे.कारण शेतात निंदण करून देखील मोठ्या प्रमाणावर गवत उगवत आहे.त्यामुळे बरेच शेतकरी पेरणी नंतर लगेच किंवा ७२ /४८ तासाच्या आत वापरायचे तणनाशक वापरात आहेत.मात्र हे तणनाशक वापरल्या नंतर काही शेतकऱ्याना या तणनाशकाचा अजिबात रिझल्ट मिटत नाही.खरं तर हे तणनाशक खूप चांगले आहेत मात्र वापरताना शेतकरी काही चुका करतात म्हणून त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तेव्हा खालील काही गोष्टी लक्षात ठेवा .
१) पेरणी झाल्यावर जमिनीत ओलावा असेल तरच तणनाशक फवारावे.
२) तणनाशक दिलेल्या प्रभावी वेळेतच वापरावे
३) तणनाशकाचे प्रमाण सांगितल्या प्रमाणेच घ्यावे .म्हणजेच योग्य प्रमाण वापरावे.
४) तणनाशकात इतर कोणतेही तणनाशक वा घटक मिसळू नये.
लगेच बघा-हे आहेत कापसाचे सर्वात टॉप ५ वाण- एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन
पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतर ७२ तासाच्या आत वापरायचे तणनाशक pre-emergence Herbicide for soyabean crop
Soybean pre-emergence Herbicide :- चला तर शेतकरी मित्रानो सुरुवातीला आपण सोयाबीन उगवण पूर्वी किंवा पेरणी झाल्यास लगेच किंवा ७२ तासाच्या आत वापरायचे तणनाशक तुम्हाला सांगणार आहोत.हे तननाशक एकदा फवारणी केले कि पुढील ४५ ते ६० दिवसा पर्यंत शेतात तान होऊ देत नाही आणि यामुळे उत्पनात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते.
1 ) वेलर सोयाबीन तणनाशक | BASF Valor 32 (Pendimethalin 30% + Imazethapyr 2% EC)
Soybean pre-emergence & post-emergence Herbicide :-सर्वप्रथम आपण सोयाबीन पिकामध्ये उगवणीपूर्वी कोणती तननाशके वापरायची याविषयी माहिती घेऊया वेल्लर 32 हे बीएसएफ कंपनीचे तननाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वेलर-32 या तन नाशकामध्ये पेंडीमेथिलिन 30% + इमाझेथायपर 2% EC हे दोन टक्के हे दोन रासायनिक घटक आहे.
वेल्हर 32 या तननाशक याची वापरायचे एकरी प्रमाण एक लिटर प्रति एकर एवढे आहे आणि हे तननाशक आपल्याला पेरणीनंतर लगेचच किंवा पेरणीनंतर 72 तासाच्या आत मध्ये वापरायचा आहे वेलर-32 हे तननाशक वापरण्यासाठी किंवा वापरायला आपल्याला एकरी रुपये 800 एवढा खर्च येतो.
अ.क्र. | रासायनिक नाव | व्यापारी नाव | कंपनी | वापराचे प्रमाण | वापराची वेळ | एकरी खर्च |
---|---|---|---|---|---|---|
1 | पेंडीमेथिलिन 30% + इमाझेथायपर 2% EC | वेलर ३२ | BASF | १ लिटर प्रति एकर | पेरणीनंतर लगेच किंवा ७२ तासाच्या आत | ८०० रुपये |
2 ) स्ट्रॉंगआर्म | Strongarm 12.4 Gm Soybean pre-emergence Herbicide
दुसरे जे तननाशक आहे ते आहे स्ट्रॉंगआर्म . डाऊ ऍग्रो सायन्स या कंपनीचे हे तणनाशक आहे.स्ट्रॉंग आर्म या तन नाशकामध्ये काय घटक हे बघूया.यात डायक्लोसूलम ८४% WDG रासायनिक घटक सामील आहे. एकरी ( १२.४ ) बारा पॉईंट चार ग्रॅम एवढे प्रमाण आपल्याला वापरायचे आहे. हे तन नाशक देखील आपल्याला पेरणीनंतर लगेच किंवा 72 तासाच्या आत मध्ये वापरायचे आहे. या तन नाशकाचा एकही खर्च रुपये 900 एवढ आहे..
अ.क्र. | रासायनिक नाव | व्यापारी नाव | कंपनी | वापराचे प्रमाण | वापराची वेळ | एकरी खर्च |
---|---|---|---|---|---|---|
1 | डायक्लोसूलम ८४% WDG | स्ट्रॉंगआर्म | डाऊ ऍग्रो सायन्स | १2.4 ग्रॅम प्रति एकर | पेरणीनंतर लगेच किंवा ७२ तासाच्या आत | 9०० रुपये |
3 ) ऑथोरिटी नेक्स्ट | FMC Authority NXT– Sulfentrazone 28% + Clomazone 30% WP pre-emergence Herbicide
टीप :- हे तणनाशक फवारतांना वापरलेला पंप या नंतर दुसऱ्या कोणत्याच फवारणीसाठी वापरू नये. कारण पंप कितीही धुतले तरी इतर पिकावर त्यांचा वाईट परिणाम होतो.
सोयाबीन उगवणी पूर्वीचे तिसरे तणनाशक शिफारस करण्यात आलेला आहे ते आहे, ऑथोरिटी नेक्स्ट.( fmc ) एफएमसी या कंपनीचा हे ऑथॉरिटी नेक्स्ट तननाशक आहे. यामध्ये SULFENTRAZONE 28% + CLOMAZONE 30% WP हे दोन रासायनिक घटक सामील आहेत. ऑथोरिटी नेक्स्ट हे आपल्याला एक इकरा करिता 500 ग्रॅम वापरायचे आहेत. हे तननाशक देखील आपल्याला पेरणीनंतर लगेचच किंवा पेरणीनंतर 48 तासाच्या आत वापरायचं आहे.याचा वापरण्याचा एकरी खर्च तुम्हाला 1800 एवढा येईल.
अ.क्र. | रासायनिक नाव | व्यापारी नाव | कंपनी | वापराचे प्रमाण | वापराची वेळ | एकरी खर्च |
---|---|---|---|---|---|---|
1 | SULFENTRAZONE 28% + CLOMAZONE 30% | ऑथोरिटी नेक्स्ट | एफएमसी ( FMC ) | 500 ग्रॅम प्रति एकर | पेरणीनंतर लगेच किंवा 48 तासाच्या आत | 1800 रुपये |