Tag Archives: UREA Fertilizer new rate

Big news :-युरिया बाबत शासनाचा मोठा निर्णय | Urea subsidy 2023 युरिया झाला स्वस्त

Urea subsidy मध्ये मोठी वाढ-आता युरिया झाला स्वस्त

Urea subsidy 2023 :- शेतकरी मित्रांनो युरियाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा दिलासा देणारा निर्णय सरकार घेणार आहे.आणि हि खात भावाच्या संदर्भात मोठी अपडेट आहे.कारण आता शेतकऱ्यांना युरिया अगदी माफक दारात शेतकऱ्यांना मिळणार असून युरियाचे भाव मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून युरियाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये निमकोटिंग युरिया आणि टॅक्सेस युरिया वगळता 242 रुपये प्रति बॅग या दरामध्ये युरिया उपलब्ध होणार आहे.अशीच योजना व शेती विषयक माहिती मोबाईवर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली लिंक दिली आहे ..

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Urea subsidy 2023 :- आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरिया मोठ्या प्रमाणावर माहागला असून अमेरिका देशांमध्ये युरियाची बॅग ३००० रुप्याच्या जवळपास पोहचली आहे. आणि देशातही मोठ्या प्रमाणावर यरियाचे भाव वाढण्याची शक्यता असताना त्यावर नियंत्रण करून शेतकऱ्यांना परवडेल अशा भावात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

युरिया उत्पादनात भारत अग्रेसर – देशाची मान उंचावणार भारत

भारता सारख्या कृषी प्रधान देशामध्ये युरियाची मागणी तसेच वाढते दर नियंत्रणात ठेवणं हे एक मोठी उद्दिष्ट शासनासमोर होते आणि शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी युरियाचे उत्पादन वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते.सध्या देशामध्ये 284 LMT पर्यंत उत्पादन क्षमता आहे.भारत देश देश युरियाच्या खताच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे.

लगेच जाणून घ्या-संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर

भारतामध्ये आता युरियाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरिया वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्याचा तुटवडा अजिबात निर्माण होणार नाही.तसेच आता सरकार नॅनो युरिया बाबत काम करताना दिसत आहे. येत्या दोन ते तीन वर्षापर्यंत 44 कोटी नॅनो युरिया
बॉटल उत्पादन क्षमता वाढविली जाणार आहे.

युरिया झाला स्वस्त हे आहेत urea चे नवीन दर


Urea subsidy 2023
:- सध्या युरियाच्या बॅगचे दर हे साधारणपणे 2200 रुपया पर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच्यामुळे सरकारने याच्यावरती सबसिडी देणे अपेक्षित होते. यामुळे पुढील तीन वर्षाकरिता 3 लाख 68 हजार कोटी रुपयांचा पॅकेज या युरियाच्या सबसिडीसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.त्यासाठी लागणारे टॅक्सेस वगळता शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये 242 रुपये प्रति बॅग एवढ्या दरामध्ये हा युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.


खर तर जमिनीचा पोत सुधारावा याकरिता युरियाचं वापर आहे.मात्र तो शेतकऱ्यांनी थोडा कमी करावा असा आग्रह सरकार शेतकऱ्यांना धरत आहे. जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी गोल्ड युरियाचं उत्पादन करण्याचे सुद्धा शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे.

मित्रांनो याच प्रमाणे गोवर्धन योजनेच्या अंतर्गत सेंद्रिय खत याचा देखील वापर वाढावा, त्याची निर्मिती वाढावि यासाठी शासनाच्या माध्यमातून 1451 कोटी रुपयांचे देखील एक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे हा देखील एक महत्वपूर्ण निर्णय आहे.

सेंद्रिय खताबरोबरच युरिया गोल्ड च्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवता येणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांना माफक दरामध्ये युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.

UREA DAP Fertilizer Rate :- शेतकऱ्यांनो सावधान ८ जिल्ह्यात युरिया व डीएपी चा साठा कमी -Urea,DAP चे भाव वाढणार का?

UREA DAP Fertilizer Rate :- शेतकऱ्यांनो सावधान ८ जिल्ह्यात युरिया व डीएपी चा साठा कमी –Urea,DAP चे भाव वाढणार का?खतसाठा उपलब्द होणार का? खताचे भाव वाढणार का?कोणत्या जिल्ह्यात हा साठा कमी आहे.या सर्व प्रश्नच उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.


दरवर्षी खरिपाच्या पहिले खत साठा उपलब्ध करून दिला जातो.२०२३ साठी मोठ्या प्रमाणावर खत साठा उपलब्ध करून दिल्याच सांगितल्या गेलं होत.मात्र सध्या ८ जिल्ह्यात खताचा साठा कमी असल्याचा प्रकार उघड झाला आहे.खरीप पेरण्या लांबल्या मात्र काही भागात धूळ पेरण्या आटोपल्या आहेत.१५ ते २० % धूळ पेरण्या झाल्याचा अंदाज आहे.

पाऊस वेळेत झाला नाही किंवा पाहिजे तसा झाला नाही तर मात्र शेतकऱ्यावर दुबार पेरणीच संकट येऊ शकते.दुबार पेरणीची वेळ आल्यास आणखी खताची गरज शेतकऱ्यांना भासणार असताना पहिलेच खत साठा कमी आहे.
खरं पाहिलं तर खत साठा कंपन्यांकडे नाही असं नाही मात्र मॉन्सून लांबल्याने बऱ्याच खत कंपन्यांकडून खताची मागणी न केल्याचा प्रकार उघड झाला आहे.राज्यातील ८ जिल्ह्यामध्ये UREA तर ४ जिल्ह्यामध्ये DAP साठा कमी आहे.या १२ जिल्यातून खताची मागणी सध्या कमी आहे.


हवामान विभागाने हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यांचा अंदाज देखील आला आहे.त्यांच्यामते २३ ते ३० तारखे पर्यंत राज्यातील बऱ्याच भगत जोरदार पावसाळा सुरुवात होणार आहे. पाऊस पुरेशा झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होईल व खताचा तुटवडा निर्माण होईल.शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नाही त्यांच्यावर तशी वेळ येऊ नाही यासाठी कृषी संचालक विकास पाटील यांनी खत साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिले आहे.

शेती व योजना मोबाईल Whatsapp ग्रुप वर मिळवा.
इथे क्लिक करा

खरिपाचे योग्य नियोजन लावण्यासाठी उन्हाळ्यातच जिल्हातरावरून कृषी विभागाकडे खताची मागणी नोंदविली जाते.त्यांच्या मागणी प्रमाणे खताचा पुरवठा करण्यात येतो.काही शेतकऱ्यानी बियाणं व खत खरेदी केले आहे.मात्र बरेच शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून अजून पर्यंत त्यांनी हि खरेदी केली नाही.

DAP

खताची मागणी नसल्या कारणाने कंपन्यांनी देखील अजून पर्यंत खत मागणी केले नाही.दमदार पावसाने हजेरी लावली तर अचानक खरेदी वाढेल व शेतकरी अडचणीत येणार अशी मोठी संभावना आहे.

खालील या जिल्ह्यात UREA DAP Fertilizer Rate खतसाठा आहे कमी.

या जिल्ह्यात खत साठा कमी असून अजून पर्यंत मागणी कमी प्रमाणात आहे.


युरिया कमी असलेले जिल्हे

अ. क्र.जिल्हे
1अकोला
2वाशीम
3हिंगोली
4नांदेड
5वर्धा
6गडचिरोली
7पालघर
8रायगड

खताचे 2023 नवीन भाव -खताचे भाव झाले कमी | fertilizer new rate 2023-भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डीएपी खत साठा कमी असलेले जिल्हे

अ. क्र.जिल्हे
1पालघर
2रायगड
3 ठाणे
4भंडारा

हे आहेत चालू वर्षाचे नवीन भाव-fertilizer price list 2023 -जाणून घ्या नाहीतर तुमची फसवणूक होईल .

संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर | fertilizer price list 2023

fertilizer price list 2023 :- शेती करायची म्हटलं कि शेतीला लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रासायनिक खात.आता पूर्वी प्रमाणे काहीच राहील नाही,पूर्वी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर होत होता आता मात्र सर्व शेतकरी फक्त आणि फक्त रासायनिक खताचा शेतीसाठी वापर करत आहेत.त्यामुळे सध्या चालू असलेल्या fertilizer price list 2023 शेतकऱ्याला माहित असणे गरजेचं आहे.

fertilizer price list 2023

दरवर्षी खताच्या भावात वाढ होत राहते तर कधी भाव सुद्धा कमी होतात.त्यामुळे जर शेतकऱ्याला चालू असलेले fertilizer price list 2023 माहित नसतील तर कृषी चालक शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात व शेतकऱ्याकडून जास्त पैसे घेतात म्हणून आज आपण विविध कंपन्यांचे खताचे दर तुम्हाला सांगणार आहोत.ज्यामध्ये युरिया,DAP,१०:२६:२६, २० २० ० १३,त्याच बरोबर संपूर्ण खताचे चालू भाव सांगणार आहोत.

Fertilizer new rate 2023 | असे असणार आहेत २०२३ चे या कंपन्यांचे खताचे बाजार भाव / खताचे भाव.

युरिया खताचे २०२३ चे बाजार भाव | UREA Fertilizer new rate

चला तर आपण सुरुवातीला विविध कंपन्यांच्या युरियाच्या किमती काय आहेत हे जाणून घेऊया.खालील बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे २०२३ चे संपूर्ण भाव जाहीर केले आहेत.खात खरेदी करत असताना वेगवेगळ्या कंपन्यांचे खात हे शेतकरी खरेदी करत असतात.

हे देखील वाचा-आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न

या कंपन्यांचे खताचे भाव जर आपल्याला माहित झाले तर कमी किमतीत उपलब्ध असलेल्या कंपनीचा युरिया आपण खरेदी करून आपला पैसा बचत करू शकतो. खाटांचे भाव खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अ. क्र. खताचे नाव कंपनीचे नाव वजनभाव
1spic ureaspic45 kg 266 रुपये
2JK Mangla UreaJK Mangla45 Kg266.5 रुपये
3Narmada Urea Narmada45 Kg266.50 रुपये
4 IFFCO Urea IFFCO45 Kg 266 रुपये
5IPL Nim coted Urea IPL45KG266 रुपये
6 RCF Ujwalaa ureaRCF Ujwalaa45KG266.50 रुपये
7Gromor ureaGromor45 kg266 रुपये
8 RFCL KISAN UREA RFCL KISAN45KG266 रुपये
9krubhako Urea krubhako45kg266 रुपये
10JK PPL UREA JK PPL45KG266.50 रुपये
11 IFFCO Nano UreaIFFCO500ml240 रुपये
12NAGARJUN UREANAGARJUN45KG266.50 रुपये

10 26 26 खताचे २०२३ चे भाव | 10 26 26 new fertilizer rate

आता जाणून घेऊया १० २६ २६ या खताचे भाव.वेगवेगळ्या कंपनीच्या भावात मोट्या प्रमाणावर तफावत दिसून येते.अशावेळी आपल्याला या खताचे भाव माहित असतील तर स्वस्त दरात उपलब्ध कमानीचे खत खरेदी करून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे बचत करू शकतो.संपूर्ण वेगवेगळ्या कंपन्यांचे खताचे बाजार भाव
खाली दिले आहेत

अ. क्र. खताचे नाव कंपनीचे नाव वजनभाव
1IFFCO 10 26 26 IFFCO50Kg 1470 रुपये
2Gromor 10 26 26 Gromor50Kg1470
3KRUBHAKO 10 26 26KRUBHAKO 50KG1470
4GROMOR ULTRA 10 26 26 GROMOR50KG 1235
5KISAN 10 26 26KISAN 50KG1175
6 PPL 10 26 26 PPL 50KG 1250
7 JAY KISAN 10 26 26 50KG1285

२० २० ० १३ खताचे २०२३ चे भाव | २० २० ० १३ new fertilizer rate

आता आपण मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपनीच्या २० २० ० १३ या खताचे २०२३ मध्ये नेमके काय भाव आहेत हे जाणून घेणार आहोत.कारण या कंपन्यांचे खताचे भाव हे वेगवेगळे असतात.आणि हे आपल्याला माहिती असणे गरजेचे असतात.

नाहीतर ज्या वेळी आपण कृषी केंद्रावर हि खात खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याकडून हे दुकानदार जास्त पैसे घेतात ,ते आपली फसवणूक करतात.आता तुमच्या लक्षात आलं असेल कि खाताचे भाव आपल्याला माहिती असणे गरजेचं का आहे.

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1spic 20 20 0 13spic50 kg 1275
2gromor 20 20 0 13gromor 50kg 1300
3 IFFCO 20 20 0 13 IFFCO 50Kg 1400
4 Mangla 20 20 0 13 Mangla50 kg1350
5 IPL 20 20 0 13- IPL50Kg 1470
6krubhako 20 20 0 13krubhako50Kg1450
7FACT 20 20 0 1350kg1400
8KISAN 20 20 0 13 50KG=1350KISAN50KG1350

DAP 18 46 00 खताचे २०२३ चे भाव | IFFCO DAP 50 kg price

DAP खता बाबत बोलायचं झाल्यास तुम्हाला माहीतच असेल कि,या खताचे भाव खूप महाग मिळते त्यामुळे DAP खताचे भाव सर्व शेतकऱ्याना माहिती असणे गरजेचे आहे .हे भाव शेतकऱ्याना माहिती असले कि स्वस्त खत पुरवठा करणाऱ्या कंपनीचे खत खरेदी करतील. आणि त्यांचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या या खताचे संपूर्ण भाव.

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1 IPL DAP 18 46 00 IPL50KG1350
2 KISAN DAP KISAN50 KG1350
3Gromor DAPGromor50 kg1370
4mangla DAPMangla50KG1350
5 IFFCO DAP IFFCO 50KG13350
6KRUBHCO DAP KRUBHCO50 KG1350
7 SAMRAT DAPSAMRAT 50KG1350
8 RCF DAP RCF 50 KG1200
9SPIC DAPSPIC50KG1350
10GROMOR ULTRA DAPGROMOR50KG1400

पोटॅश ( MOP ) खताचे २०२३ चे भाव | MOP new fertilizer rate

आता आपण एकूण ५ कंपन्यांचे पोटॅश २०२३ चे नवीन भाव काय आहेत पाहणार आहोत.ज्यामध्ये खाताचे नाव काय.खताचे भाव 2023.खताची कंपनी याबाबत सुद्धा माहिती देणार आहोत.खताच्या बॅगचे वजन किती किलोचे आहे हे देखील सांगणार आहोत .आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या कंपनीच्या खताचे भाव किती आहेत हि संपूर्ण माहिती खालील रकान्यात पाहायला मिळेल .

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1पोटॅश IPL MOPIPL50KG1700
2पोटॅश GROMOR MOP GROMOR50 KG 1700
3पोटॅश ZUARI MANGLA MOPZUARI MANGLA50KG 1700
4पोटॅश IFFCO MOPIFFCO50KG 1700
5 पोटॅश KRUBHAKO MOP KRUBHAKO50KG1700

UREA -युरिया काम काय ?युरियाचे फायदे काय.

चला आता थोडक्यात जाणून घेऊया कोणत्या खताचे काय फायदे असतात तसेच ते खात कधी वापरायचे.युरिया हे खात पिकासाठी अतिशय महत्वाचे असते.कारण या खतामध्ये नत्र हा घटक असतो आणि पिकाचा हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी हे काम करत असते .युरियामुळे नवीन पानं तयात होतात.

पिकात आलेला पिवळेपणा दूर होतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकाच्या वाढीसाठी नत्र खूप महत्वाचे असते .तुमचे पीक वाढत नसल्यास तुम्ही युरियाचा वापर करू शकता.मात्र अधिक प्रमाणात युरिया वापरयास झाड फक्त वाढत जातात म्हणून युरिया गोगय प्रमाणात वापरावा.

SSP सिंगल सुपर फॉस्फेट काय करते.त्याचे फायदे काय ?

सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये फॉस्फरस हा १४% असतो.सल्फर हा ११% तर कॅल्शियम २१ % असते.आणि हे घटक प्रत्येक पिकासाठी आवश्यक असतात. सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास झाडाचे फुटवे वाढण्यास मदत होते. याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

या खताच्या वापराचा दुसरा फायदा असा कि हे खात वापरल्यास झाडाचे खोड हे मजबूत होते.बियाणातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी हे खात मदत करतात.यामुळे जमिनीतील पाण्याला धरून ठेवण्याची ताकत असते.

पोटॅश चे कार्य काय? पोटॅश वापराचे फायदे जाणून घ्या.

पिकासाठी पोटॅशचे अनन्यसाधारण महत्व आहे .या मुळे मुळांची योग्य अशी वाढ होते व जमिनीची अन्नद्रव्य घेण्यास पिकाला मदत होते.पिकांच्या फळांची वाढ करण्यासाठी पोटॅश काम करत असते.याने पिकाच्या शेंगा टपोऱ्या होतात दाण्याचा आकार वाढतो सोबतच त्याला रंग खुलतो व त्याला चकाकी येते .झाडातील प्रोटीन वाढविण्याचं काम देखील पोटॅश करत असते.प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेला पोटॅश मदत करते.