Tag Archives: US 7067 Cotton Seeds

कपाशी 7067 cotton seed खरचं चांगली आहे का ? जाणून घेऊया A टु Z माहिती

प्रस्तावना:- या वाणाचे नाव यु एस ॲग्री सीडीची 7067 आहे.7067 cotton seed या वाणाला देखील बरेच शेतकरी लागवड करतांना दिसत आहेत . .चला आता जाणून घेऊया नेमकं हे वाण आहे तरी कसं? या कपाशीचा कालावधी किती दिवसाचा आहे. लागवडीचे अंतर किती घायचे आहेत, म्हणजे किती अंतरावर लागवड करायला पाहिजे?

हे वाचा- मान्सून लांबणीवर -पंजाब डंख म्हणतात दुष्काळ पडणार.

7067 या वाणाच्या कपाशीचे बोन्डाचे वजन किती आहेत? तसेच हे कोणत्या राज्यासाठी शिफारस करण्यात आलेले आहेत? कोणत्या जमिनीत लागवड करावी? त्यापासून उत्पन्न किती मिळणार ? अशा तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नच उत्तर .तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की बघा us agri 7067 वाणाची A टु Z माहित तुम्हाला मिळणार आहे.

Agriseeds us 7067 cotton seeds वाणाचे नाव व कंपनीची संपूर्ण माहिती

या वाणाचे नाव US 7067 आहे.हे वाण us agriseeds या कंपनीचे आहे.या कंपनीने देखील मार्कीटमध्ये बरेच वाण आणले असून शेतकऱ्यानी ते वापरले असून चांगल्या प्रकारे शेतकऱ्याना उत्पन्न मिळालं आहे.त्याच बरोबर us ७०६७ हे वाण देखील सध्या फारच प्रचलित होत असून.या कंपनीचे अनेक वाण महाराष्ट्रा,गुजरात व कापसाचे सर्वात जास्त उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात देखील शेतकरी वापरतात.

जमिनी निहाय लागवडीचे अंतर किती असावे ?

कोणत्याही पिका पासून अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास त्या पिकाची लागवड अतिशय महत्वाची ठरते आणि त्यावरच शेतकऱ्याना होणारे उत्पन्न ठरत असते.त्यामुळे आम्ही सांगत असलेली लागवड पद्धत वापरा किंवा तुम्हा एखाद्या लागवडीचा विशेष अनुभव असेल तर ती लागवड पद्धत फायद्याची असेल तर ती लागवड देखील तुम्ही वापरू शकता आणि ती लागवड पद्धत कमेंट करून नक्की सांगा.

us 7067 cotton seeds या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे असा तुमचा प्रश्न असेल तर हे वाण 160 ते 170 दिवसाचे आहे.या वाणाची लागवड तुम्हाला जर तुम्हाला भारी जमिनीत करायची असेल तर ४ बाय ४ वर करता येईल.जर माध्यम जमीन असेल तर मात्र ४ बाय १.५ किंवा ४ बाय १ वर करू शकता आणि माध्यम जमिनीत 3 बाय 2 अंतरावर या कपाशीचे आपण लागवड करायला पाहिजे किंवा ३ बाय ३ हे अंतर चांगले राहील यात झाडाची संख्या वाढेल.

us agri 7067 चे बोन्डाचे वजन व होणारे उत्पन्न

us agriseeds 7067:- बोन्डाचा आकार हा मुद्दा कापसाच्या बाबतीत अतिशय महत्वाचा असून बरेच शेतकरी नेहमी मोठ्या बोन्डाचे वाण लागवडीसाठी निवडतात.कारण कापसाचे मोठे बॉण्ड असेल तर अधिक उत्पन्न मिळण्याची मोठी शक्यता असते .करम मोठे बॉण्ड असेल तर त्याच वजन देखील जास्त भरते आणि त्यापासून उत्पन्न देखील अधिक होते.या ७०६७ या कापसाचे बॉण्ड आकाराने मोठे असून ५ ते ५.५ ग्रॅम आहे.

७०६७ हे वाण कोणत्या विभागात लावता येईल -कोणत्या राज्यासाठी शिफारस आहे?

कापसाचे वेगवेगळे वाण आहेत आणि ते प्रत्येक वाण एका विशिष्ट जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेले आहेत.त्याच बरोबर विविध विभागासाठी बनविण्यात आलेले आहेत.विभाग म्हणजे एखाद्या राज्यासाठी एखादे वाण चांगले येते तर तेच वाण दुसऱ्या राज्यात पाहिजे तसा एव्हरेज देत नाही. आता ७०६७ cotton seeds कोणत्या राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे असावा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही या वाणाची लागवड महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी ही US Agriseeds ची 7067 ही जात लावायला काही हरकत नाही.

us 7067 cotton seeds वाणाचे वैशिट्य

१) मध्यम ते भारी जमीन या वाणाच्या लागवडीसाठी योग्य.
२) कापूस वेचणीला सोपा आहे.
३) सर्व बोंड एकदाच वेचणीला येतात.त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याची अशी व्हरायटी आहे
४) रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षमता जास्त आहेत.
५) दुबार पीक घेण्यासाठी हे वाण अतिशय चांगले आहेत.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II)विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकारमोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2,4 x 1,3 x 3, 4 x 1.5
11लागवड वेळमे – जून

तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच पोर्टल ला सबस्क्राईब करून लेखाला लाईक करा. तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी लागवड करणार आहेत किंवा तुमच्या भागामध्ये कोणती व्हरायटीचांगली येते हे नाकीयच सांगा.

हे आहेत सर्वात जास्त उत्पन्न देणारे वाण-मिळणार एकरी १५ क्विंटलहुन अधिक उत्पन्न .

तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या वाणाची माहिती पाहिजे आहे हे नक्की सांगा. ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा कारण चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करायला तयार आहे तर त्यामुळे कामाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही नक्की पार पाडा आणि हा लेख तुमचा पाशी असलेल्या whatsapp ग्रुप वर व शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा.

कापूस टॉप 5 वाण | cotton seed top variety 2023 | kapus top 5 biyane

कापसाचे सर्वात उत्कृष्ट वाण | kapus biyane 2023 | cotton seed top variety 2023

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो.मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होत आहे आणि खरीप हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जातं.भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील म्हणतो. भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जागतिक पातळीवरती कापूस पिकाला आता अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेला आहे.

cotton seed top variety 2023

हे वाचा-RBI चा २००० च्या नोट बंदी बाबत मोठा निर्णय – नोट या तारखेच्या आत जमा करून घ्या

cotton seed top variety 2023 :- शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कापूस पिकाच्या पिकाबद्दल, लागवडीबद्दल चर्चा करत असतो,त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे की, यंदाच्या हंगामामध्ये कापूस पिकात कोणती वाण आपण लावायचं.

म्हणजेच काय कापूस पिकाची कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे.आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर मी तुम्हाला कापूस पिकाचे या ठिकाणी पाच अशा सुधारित जातींची नावे सांगणार आहेत की,ज्या जाती तुमच्या अधिक फायदेशीर राहतील तसेच हे वाण रोगांना कमी प्रमाणात बळी पडणार आहेत.

त्यांच्या उगवणीसाठी त्यांच्या वाढीसाठी तुम्हाला उत्पादन खर्च देखील कमी येणार आहे तसेच तुम्हाला उत्पादन आणि उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे.

राशी 659 ( RASHI 659 SEEDS ) Cotton Seeds

हे देखील वाचा – महाबीज बियाणांचे २०२३ चे सुधारित दर जाहीर

cotton seed top variety 2023 :- चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पाहूया राशीचे एका सुधारित वाणाबद्दल ज्याचं नाव आहे राक्षी 659 (Rashi 659 variety ) हे वाण भारी जमिनीस शिफारस शिफारस काढण्यात आलेला आहे तसेच बागायती या दोन्ही प्रकारच्या सिंचनासाठी तुम्ही हे वाण वापरू शकता.

अधिक माहिती खलील रकरण्यात दिली आहे….

अ.क्र.राशी 659 विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक

कबड्डी कापूस बियाणे (KABADDI) TULSI SEEDS | kabaddi cotton seeds

cotton seed top variety 2023 :- महाराष्ट्रात सध्या दुसरा क्रमांक हा कबड्डी कापूस बियाणे वाणाचा आहे.गेल्या 2 वर्षात या वाणांनी शेतकऱ्यांना खुप साथ दिली असून इतर वाणाच्या तुलनेत हे वाण शेतकऱ्यांच्या अधिक पसंतीस उतरले आहे.जवळजवळ सर्वच जमिनीमध्ये हे वाण तुम्ही लावू शकता. या वाणाची खास करून कोरडवाहु व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं आहे.गेल्या 2 वर्षात फरदडसाठी हे वाण अतिशय उपयुक्त आहे..राशी 659 प्रमाणेच हे देखील अधिक उत्पादन देणारं वाण आहे.

अ.क्र.कबड्डी ( kabaddi) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 180 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 8 ते 15 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10लागवड वेळमे ते जून

सुपरकॉट प्रभात सीड्स | Prabhat SuperCot BG II | Cotton Seeds

cotton seed top variety 2023 :- वरील २ वाणा प्रमाणेच २०२२ मध्ये प्रभात सीड्स च्या सुपरकॉट (supercot ) या वाणाने देखील विक्रम नोंदविला आहे.हे देखील वाण मोठ्या बंडाचे असून आधीक विक्रमी उत्पादन दिले असून भरपूर शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दर्शविली आहे.हे वाण रसशोषक किडीसाठी तसेच लाल्या रोगासाठी अधिक प्रतिकारक आहे.बर्याच शेतकऱ्यानी या वाणापासून सहजरित्या १० ते १२ क्विंटल पर्यंत एव्हरेज घेतलं आहे.

अ.क्र.सुपरकॉट ( SuperCot BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 170 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5.5 ते 6.3 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर4 *1.5
11लागवड वेळमे ते जून

यु. एस. 7067 | us agri seeds US 7067 | US 7067 Cotton Seeds

us agri seeds US 7067 :- यु.एस. ७०६७ हे वाण माध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलं असाल तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील शेतकऱ्यांना बरच उत्पादन देऊन गेलं आहे. मागील २ वर्षात या वाणाने देखील शेतकऱ्यांना नाराज केलं नाही.हे वाण लवकर येणारे असल्याने हलक्या जमिनीत पावसाचा आधार घेत अधिक उत्पादन देत आहे.हे वाण विविध रोग व किडीसाठी प्रतिकारक आहे व दात लागवडीसाठी हे वाण चांगले आहे.बोन्डाचे वजन चांगले असून गोलाकार व मोठ्या बोन्डाचे वाण आहे.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2
11लागवड वेळमे

अजित १५५ | Ajeet 155 ( Ajeet seeds ) Cotton Seeds

अजित १५५ या वाणाला पाण्याचा ताण सहन होत असल्यामुळे हे वाण हलक्या जमिनीत देखील येते.त्यामुळे कोरडवाहू शेतकरी या वाणाचा जास्त प्रमाणात वापर करताना दिसतात.हे वाण आपण हलक्या,माध्यम व भारी जमिनीत देखील घेऊ शकतो.या वाणाचा बोन्डाचा आकार थोडा लहान असतो मात्र जास्त बोन्ड संख्या येत असल्याने अधिक उत्पन्न बघायला मिळते.मात्र हे कमी कालावधीचे वाण आहे.

अ.क्र.अजित १५५ ( Ajeet seeds) विवरण
1जमीनहलकी,मध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मध्यम
5वजन5 ते 5.5 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 6 ते 8 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2 / पावली
11लागवड वेळमे

राशीच्या आणखी काही वाणा बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा -धन्यवाद