Tag Archives: US 7067

कपाशी 7067 cotton seed खरचं चांगली आहे का ? जाणून घेऊया A टु Z माहिती

प्रस्तावना:- या वाणाचे नाव यु एस ॲग्री सीडीची 7067 आहे.7067 cotton seed या वाणाला देखील बरेच शेतकरी लागवड करतांना दिसत आहेत . .चला आता जाणून घेऊया नेमकं हे वाण आहे तरी कसं? या कपाशीचा कालावधी किती दिवसाचा आहे. लागवडीचे अंतर किती घायचे आहेत, म्हणजे किती अंतरावर लागवड करायला पाहिजे?

हे वाचा- मान्सून लांबणीवर -पंजाब डंख म्हणतात दुष्काळ पडणार.

7067 या वाणाच्या कपाशीचे बोन्डाचे वजन किती आहेत? तसेच हे कोणत्या राज्यासाठी शिफारस करण्यात आलेले आहेत? कोणत्या जमिनीत लागवड करावी? त्यापासून उत्पन्न किती मिळणार ? अशा तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नच उत्तर .तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की बघा us agri 7067 वाणाची A टु Z माहित तुम्हाला मिळणार आहे.

Agriseeds us 7067 cotton seeds वाणाचे नाव व कंपनीची संपूर्ण माहिती

या वाणाचे नाव US 7067 आहे.हे वाण us agriseeds या कंपनीचे आहे.या कंपनीने देखील मार्कीटमध्ये बरेच वाण आणले असून शेतकऱ्यानी ते वापरले असून चांगल्या प्रकारे शेतकऱ्याना उत्पन्न मिळालं आहे.त्याच बरोबर us ७०६७ हे वाण देखील सध्या फारच प्रचलित होत असून.या कंपनीचे अनेक वाण महाराष्ट्रा,गुजरात व कापसाचे सर्वात जास्त उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात देखील शेतकरी वापरतात.

जमिनी निहाय लागवडीचे अंतर किती असावे ?

कोणत्याही पिका पासून अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास त्या पिकाची लागवड अतिशय महत्वाची ठरते आणि त्यावरच शेतकऱ्याना होणारे उत्पन्न ठरत असते.त्यामुळे आम्ही सांगत असलेली लागवड पद्धत वापरा किंवा तुम्हा एखाद्या लागवडीचा विशेष अनुभव असेल तर ती लागवड पद्धत फायद्याची असेल तर ती लागवड देखील तुम्ही वापरू शकता आणि ती लागवड पद्धत कमेंट करून नक्की सांगा.

us 7067 cotton seeds या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे असा तुमचा प्रश्न असेल तर हे वाण 160 ते 170 दिवसाचे आहे.या वाणाची लागवड तुम्हाला जर तुम्हाला भारी जमिनीत करायची असेल तर ४ बाय ४ वर करता येईल.जर माध्यम जमीन असेल तर मात्र ४ बाय १.५ किंवा ४ बाय १ वर करू शकता आणि माध्यम जमिनीत 3 बाय 2 अंतरावर या कपाशीचे आपण लागवड करायला पाहिजे किंवा ३ बाय ३ हे अंतर चांगले राहील यात झाडाची संख्या वाढेल.

us agri 7067 चे बोन्डाचे वजन व होणारे उत्पन्न

us agriseeds 7067:- बोन्डाचा आकार हा मुद्दा कापसाच्या बाबतीत अतिशय महत्वाचा असून बरेच शेतकरी नेहमी मोठ्या बोन्डाचे वाण लागवडीसाठी निवडतात.कारण कापसाचे मोठे बॉण्ड असेल तर अधिक उत्पन्न मिळण्याची मोठी शक्यता असते .करम मोठे बॉण्ड असेल तर त्याच वजन देखील जास्त भरते आणि त्यापासून उत्पन्न देखील अधिक होते.या ७०६७ या कापसाचे बॉण्ड आकाराने मोठे असून ५ ते ५.५ ग्रॅम आहे.

७०६७ हे वाण कोणत्या विभागात लावता येईल -कोणत्या राज्यासाठी शिफारस आहे?

कापसाचे वेगवेगळे वाण आहेत आणि ते प्रत्येक वाण एका विशिष्ट जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेले आहेत.त्याच बरोबर विविध विभागासाठी बनविण्यात आलेले आहेत.विभाग म्हणजे एखाद्या राज्यासाठी एखादे वाण चांगले येते तर तेच वाण दुसऱ्या राज्यात पाहिजे तसा एव्हरेज देत नाही. आता ७०६७ cotton seeds कोणत्या राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे असावा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही या वाणाची लागवड महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी ही US Agriseeds ची 7067 ही जात लावायला काही हरकत नाही.

us 7067 cotton seeds वाणाचे वैशिट्य

१) मध्यम ते भारी जमीन या वाणाच्या लागवडीसाठी योग्य.
२) कापूस वेचणीला सोपा आहे.
३) सर्व बोंड एकदाच वेचणीला येतात.त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याची अशी व्हरायटी आहे
४) रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षमता जास्त आहेत.
५) दुबार पीक घेण्यासाठी हे वाण अतिशय चांगले आहेत.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II)विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकारमोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2,4 x 1,3 x 3, 4 x 1.5
11लागवड वेळमे – जून

तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच पोर्टल ला सबस्क्राईब करून लेखाला लाईक करा. तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी लागवड करणार आहेत किंवा तुमच्या भागामध्ये कोणती व्हरायटीचांगली येते हे नाकीयच सांगा.

हे आहेत सर्वात जास्त उत्पन्न देणारे वाण-मिळणार एकरी १५ क्विंटलहुन अधिक उत्पन्न .

तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या वाणाची माहिती पाहिजे आहे हे नक्की सांगा. ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा कारण चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करायला तयार आहे तर त्यामुळे कामाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही नक्की पार पाडा आणि हा लेख तुमचा पाशी असलेल्या whatsapp ग्रुप वर व शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा.