२०२३ ट्रॅक्टर अनुदान योजना झाली सुरू | Tractor Anudan yojana 2023

ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ सुरू | Tractor Anudan yojana 2023

Tractor Anudan yojana 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो, आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी,राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2023-24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया अनुदानात किती वाढ झाली?अर्ज कोणाला करता येणार? पात्रता काय?अर्ज कुठे करावा कागदपत्र काय लागणार? हि संपूर्ण माहिती

Tractor Anudan yojana 2023

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2023-24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि च्यासाठी 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले आहे, मित्रांनो याचा संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 31 मे 2023 रोजी काढण्यात आलेला आहे.

Tractor Anudan yojana 2023

कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोठा आला-पहा कोणत्या जिल्ह्याचा कोठा वाढणार?

केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषीयंत्र अनुदानावरती दिली जातात.मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे असलेला कल, याचबरोबर वाढतीय शेतकऱ्यांची मागणी या केंद्र पुरस्कृत कृषीयंत्रिकीकरण योजनेमध्ये पूर्ण होत नाही आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 100 टक्के निधी हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार योजना ही राबवली जाते.या योजनेला काही शेतकरी मित्र Mahadbt Tractor Yojana 2023 या नावाने देखील ओळखतात

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी किती अनुदान मिळणार? मंजूर निधी किती? | Tractor Anudan yojana maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो या योजनेकरता 2023-24 या वर्षांमध्ये 300 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.या पैकी 70 टक्के निधीच्या मर्यादेमध्ये 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.या Tractor Anudan yojana 2023 अंतर्गत ट्रॅक्टर अवजारे अनुदान बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला,अत्यल्प भूदर्शक शेतकरी यांच्यासाठी किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कुठे करायचा? निवड प्रक्रिया कशी असणार?

12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचा वितरण केलं जाईल. योजना पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाते, शेतकऱ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करावे लागतात. अर्ज केल्या नंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो. तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे या बाबतचा शासन निर्णय https://gr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहू शकता. तसेच हा GR आपण पडफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.

Tractor Anudan yojana 2023 साठी लागणारे कागदपत्रे

महा DBT पोर्टलवर सुरुवातील तुम्हाला फक्त रजिस्टेशन करावं लागते. त्यावेळी कोणतेही कागदपत्र तुम्हाला मागितले जात नाहीत मात्र तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला खालील कागदपत्र उपलोड करावी लागतात.

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) ड्रायविंग लायसन्स
४) ट्रॅक्टर कोटेशेन
५) टेस्ट रिपोर्ट
६ ) ST /SC प्रवर्ग असल्यास जातीचा दाखला
७) महिला असल्यास दोन नावाची व्यक्ती एक असल्याचं प्रमाणपत्र

8) लाभार्थ्याचा ७/१२ व ८ आ
9) पूर्वसंमती
10) स्वयंघोषणापत्र

Tractor Anudan yojana 2023

मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसायिकांना मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज,असा कारा ऑनलाईन अर्ज

FAQ

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी

ट्रेक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र

ANS-

शेतकऱ्यासाठी सरकारच्या माध्यमातून हि योजना राबविली जात असून महा डीबीटी ( Maha DBT ) पोर्टलच्या माध्यमातून अनुदान दिले जाते अर्ज प्रक्रिया दिखील या पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केली जात। ट्रॅक्टर अनुदान यादी हि या पोर्टलच्या माध्यमातून प्रकशित केली जाती हि यादी कृषी विभागाच्या फलकावर देखील प्रकाशित केली जात



पंतप्रधान ट्रॅक्टर योजना


अनुदान योजना महाराष्ट्र 2023


मुख्यमंत्री ट्रैक्टर योजना


किसान ट्रैक्टर योजना महाराष्ट्र


PM Kisan Tractor Yojana official website


प्रधानमंत्री ट्रैक्टर योजना हेल्पलाइन नंबर

Leave a Comment