Category Archives: Uncategorized

Big news :-युरिया बाबत शासनाचा मोठा निर्णय | Urea subsidy 2023 युरिया झाला स्वस्त

Urea subsidy मध्ये मोठी वाढ-आता युरिया झाला स्वस्त

Urea subsidy 2023 :- शेतकरी मित्रांनो युरियाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा दिलासा देणारा निर्णय सरकार घेणार आहे.आणि हि खात भावाच्या संदर्भात मोठी अपडेट आहे.कारण आता शेतकऱ्यांना युरिया अगदी माफक दारात शेतकऱ्यांना मिळणार असून युरियाचे भाव मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून युरियाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये निमकोटिंग युरिया आणि टॅक्सेस युरिया वगळता 242 रुपये प्रति बॅग या दरामध्ये युरिया उपलब्ध होणार आहे.अशीच योजना व शेती विषयक माहिती मोबाईवर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली लिंक दिली आहे ..

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Urea subsidy 2023 :- आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरिया मोठ्या प्रमाणावर माहागला असून अमेरिका देशांमध्ये युरियाची बॅग ३००० रुप्याच्या जवळपास पोहचली आहे. आणि देशातही मोठ्या प्रमाणावर यरियाचे भाव वाढण्याची शक्यता असताना त्यावर नियंत्रण करून शेतकऱ्यांना परवडेल अशा भावात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

युरिया उत्पादनात भारत अग्रेसर – देशाची मान उंचावणार भारत

भारता सारख्या कृषी प्रधान देशामध्ये युरियाची मागणी तसेच वाढते दर नियंत्रणात ठेवणं हे एक मोठी उद्दिष्ट शासनासमोर होते आणि शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी युरियाचे उत्पादन वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते.सध्या देशामध्ये 284 LMT पर्यंत उत्पादन क्षमता आहे.भारत देश देश युरियाच्या खताच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे.

लगेच जाणून घ्या-संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर

भारतामध्ये आता युरियाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरिया वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्याचा तुटवडा अजिबात निर्माण होणार नाही.तसेच आता सरकार नॅनो युरिया बाबत काम करताना दिसत आहे. येत्या दोन ते तीन वर्षापर्यंत 44 कोटी नॅनो युरिया
बॉटल उत्पादन क्षमता वाढविली जाणार आहे.

युरिया झाला स्वस्त हे आहेत urea चे नवीन दर


Urea subsidy 2023
:- सध्या युरियाच्या बॅगचे दर हे साधारणपणे 2200 रुपया पर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच्यामुळे सरकारने याच्यावरती सबसिडी देणे अपेक्षित होते. यामुळे पुढील तीन वर्षाकरिता 3 लाख 68 हजार कोटी रुपयांचा पॅकेज या युरियाच्या सबसिडीसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.त्यासाठी लागणारे टॅक्सेस वगळता शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये 242 रुपये प्रति बॅग एवढ्या दरामध्ये हा युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.


खर तर जमिनीचा पोत सुधारावा याकरिता युरियाचं वापर आहे.मात्र तो शेतकऱ्यांनी थोडा कमी करावा असा आग्रह सरकार शेतकऱ्यांना धरत आहे. जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी गोल्ड युरियाचं उत्पादन करण्याचे सुद्धा शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे.

मित्रांनो याच प्रमाणे गोवर्धन योजनेच्या अंतर्गत सेंद्रिय खत याचा देखील वापर वाढावा, त्याची निर्मिती वाढावि यासाठी शासनाच्या माध्यमातून 1451 कोटी रुपयांचे देखील एक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे हा देखील एक महत्वपूर्ण निर्णय आहे.

सेंद्रिय खताबरोबरच युरिया गोल्ड च्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवता येणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांना माफक दरामध्ये युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Ayushman bharat yojana आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार-मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ayushman bharat yojana व mahtma fule jan arogy yojna यात झाला मोठा बदल.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची Ayushman bharat yojana यात आता मोठा बदल करण्यात आला असून लवकरच हे बदल झाल्यानंतर नवीन स्वरूपाच्या योजना लागू होणार आहेत.हा निर्णय नागरिकांसाठी महत्वाचा असून देशातील लाखो नागरिकांना आता मोठा फायदा होणार आहे.


चला तर पाहूया योजनेत काय बदक झाला कधी पासून नवीन योजना लागू होणार? कोणत्या नागरिकांना योजनेचा लाभ होणार या बाबतची सविस्तर माहिती.योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाइलला वर मोफत मिळविण्यासाठी आमचा खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजनेत बदल झाला असून आता या योजनेअंतर्गत देशातील सर्वांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपये विमा असलेले संरक्षण आता मिळणार आहे.आता लवकरच कार्ड वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहेत.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निरणार्यापैकी हा महत्वाचा निर्णय आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तुम्हाला तर माहीतच असेल पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब 1.5 लाख होते आता त्यात बदल झाला असून 5 लाख रुपये एव्हढा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ आता घेता येणार आहे.

अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त अंतोदय व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येत होता आता मात्र राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना हा लाभ मिळणार आहे आणि हि सर्वात महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अधिवास प्रमाणपत्र धारान करणाऱ्या सर्व नागरिकांना हि योजना अगदी मोफत मिळणार आहे असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.

नवीन योजनेचे वैशिष्ट्य नक्की काय आहेत हे पहा.

१) अगोदर फक्त हा लाभ केशरी शिधापत्रिका व अंतोदय शिधापत्रिकांना मिळत होता .आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणार आहे.

२) पहिले आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब १.५ लाख रुपये मिळत होते. आता संरक्षण प्रति कुटुंब 5 लाख रुपये एवढे करण्यात आलेले.

३) दोन्ही योजनांसाठी आता एकच कार्ड लागू होणार आहे आणि कार्ड वाटप सुद्धा लवकर सुरू होणार आहे.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत मोठा बदल-लाभार्थ्यांना मोठा दिलास – पहा सविस्तर

४) दोन्ही योजनांच्या अनुशंगाने रुग्णाचा उपचार होणार आहे.

५) महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 96 तर आयुष्मान भारत योजनेमध्ये १२०९ असे एकूण १३५६ उपचार रुग्णांना लागू होणार.

६) मूत्रपिंड शस्त्रक्रिया मर्यादा २.5 हुन ४.५ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

७) महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालयात योजना सुरु करणार.

८) अपघातविमा उपचारांची संख्या 74 वरून आता 184 इतकी वाढविण्यात आली.

sanjay gandhi niradhar yojna-संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत मोठा बदल-लाभार्थ्यांना मोठा दिलास shravan bal niradhar yojna

sanjay gandhi niradhar yojna :-नमस्कार मित्रांनो,.आज मंत्रिमंडळात निर्णय भरपूर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामधला हा एक मंत्रिमंडळ निर्णय ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजनाया बाबतचा आहे.आजचा सरकारचा हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.


त्यासंदर्भातला हा निर्णय नेमका काय आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.आणि अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

sanjay gandhi niradhar yojna व श्रावणबाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या बद्दल तुम्हाला तर माहीतच असेल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये आता मानधनात वाढ होणार आहे.

निराधार महिला व पुरुषांना आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतुन दरमहा 500 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाय गोठा अनुदान-Gay Gotha Yojna २०२३;आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..

सध्या या दोन्ही योजनेत 1000 हजार रुपये इतके मासिक अर्थसाह्य देण्यात येते आता त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते मानधन 1500 रुपये इतके होणार आहे. एक अपत्य असल्यास या विधवा लाभार्थ्यांना सध्या 1100 तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थींना 1200 इतके मासिक अर्थसहाय्यद देण्यात येते.आता या अनुदानात अनुक्रमे आता 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे सादर योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांत मिळून 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजर 400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यताता देण्यात आलेली आहे.

पशुखाद्य व वैरण योजना | Pashu khady vairan yojna | शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

पशुखाद्य व वैरण योजना –शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

शेतकरी मित्रांनो,तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर मात्र आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Pashu khady vairan yojna जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.

या बाबतचा शासनाकडून GR देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. ही योजना कशी असणार आहे? नेमका कोणाला लाभ मिळणार? तर पाहूयात याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

दिनांक 21 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने हा हा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे.आणि या GR च्या माध्यमातून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.आता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमूद विविध सहा उपघटकांचा समावेशकरण्यात आलेला आहे.

हि योजना सन २०२३-24 पासून राज्यात राबविण्यात शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आलेली आहे. खालील सहा उपघटकांचा एकेक करून या ठिकाणी आपण माहित पाहणार आहोत. शेतकऱ्यांच्या शेतावर वेरण उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा सरकारचा उद्देश आहे.शेतकरी मित्रानो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घायचा असेल तर लाभार्थीकडे वरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असणार आहे

रेशन बाबत मोठी घोषणा-आता धान्या ऐवजी मिळणार पैसे
पहा तुम्हाला मिळणार का ?त्यासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमांतर्गत खालील वैरणीचे बियाणे वाटप केले जाणार आहेत.


१) ज्वारी
२) मका
३) बाजरी
४) बरसिम
५) लुर्सन
६) न्यूट्री फीड
७) नेपियर
८) यशवंत
९) जयवंत

अशाप्रकारे शेतकर्याना सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातीचे ठोंबरे वाटप केले जाणार आहेत.या योजनेअंतर्गत या ठिकाणी उल्लेख केलेले वैरण्य तसेच संदर्भातले बियाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत. शेतकरी मित्रानो ज्या लाभार्थीकडे स्वतःची पाकीट कमी तीन ते चार जनावरे आहेत अशा लाभार्थींना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थीला एक एकरच्या क्षेत्रात चारा पीक उत्पादन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर 1500 रुपये च्या मर्यादेत वैरणीच्या बियाण्यांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हि वैरणीची नेमकी कुठून मिळणार :- वेरणीची बियाणे व ठोंब्याची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळ महाबीज किंवा इतर शासकीय संस्था किंवा कृषी विद्यापीठे,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र किंवा पशुधन विकास मंडळांतर्गत ची प्रक्षेत्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळा अंतर्गत ची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यांच्या माध्यमातून उपलध करण्यात येणार आहेत.

संकरित किंवा देशी गोवंशीच्या कालवडी तसेच सुधारित देशी पारड्याची जोपासना करण्यासाठी अर्थसाह्य

पशुपालकांकडील संकरित / देशी कालवडी व सुधारित / देशी म्हशीच्या पारडया शास्त्रोक्त पध्दतीने जोपसण्यासाठी त्यांना सकस खाद्य देऊन तसेच, पशुपालकांना प्रशिक्षित करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित गायी व सुधारित म्हशींची निर्मिती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सदर योजनेमध्ये पशुखाद्याच्या स्वरुपात अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक व भूमिहीन शेतमजूरांस ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे व पशुपालकांकडील संकरीत / देशी कालवडी / सुधारीत / देशी पारड्यांचा विमा उतरविणे या सर्व गोष्टीवर भर देण्यात येणार आहे.


Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रानो लाभार्थीकडील संकरित / देशी असलेल्या कालवडीस तिच्या वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ३२ महिन्यांपर्यंत खाद्य पुरविले जाणार आहे .त्यासोबतच सुधारित / देशी पारडीला वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ते ४० महिन्यांपर्यंत ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविण्यात पुरविण्यात येण्याची तरतूद करण्यात अली आहे.

शेतीविषयक योजना व माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.
इथे क्लिक करा


हा खाद्य पुरवठा प्रत्येक महिन्याला देण्यात येणार नाही. खाद्य देणे सुरू केलेल्या तारखेपासून दर तीन महिन्याने खाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.
खालील तक्त्या प्रमाणे खाद्य पुरवठा करणे बंधन कारक असणार आहे.

अ.क्र. कालवड / पारडीचे वय (महिना)प्रतिदिन पशुखादयएकुण पशुखादय
1४ था महिना१ कि.ग्रॅ.३० कि.ग्रॅ.
2५ वा महिना१.५०० कि.ग्रॅ.४५ कि.ग्रॅ.
3६ वा महिना१.७५० कि.ग्रॅ.५२.५०० कि.ग्रॅ.
4७ ते १८ महिने२ कि.ग्रॅ.७२० कि.ग्रॅ.
5१९ ते ३२ महिने २.५०० कि. ग्रॅ.१०५० कि.ग्रॅ.
6१९ ते ४० महिने२.५०० कि. ग्रॅ.१६५० कि. कि.ग्रॅ.

मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्याअंतर्गत सायलेज बॅक खरेदी 50% अनुदान.

Pashu khady vairan yojna :-शेतकरी मित्रांनो,बऱ्यापैकी शेतकरी घरच्या घरी मुरघास तयार करतात.मात्र ती साठवण करण्यासाठी शेतकऱ्याकडे बॅग उपलब्ध नसतात आता मात्र शेतकर्याची काळजी मिटली आहे. आता सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मुरघास तयार केल्यानंतर त्याची साठवणूक करणाऱ्या बॅक खरेदी वर या 50% अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे.

Animal feed:-मित्रांनो या ठिकाणी मुरघास निर्मितीसाठी एकूण दहा पॉलिथिन बॅक खरेदी करतात प्रति पशुपालक 50 टक्के अनुदान याप्रमाणे रुपये 3000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.

त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.आणि मुरघास साठवणूक करण्यासाठी आता शेतकऱ्यांना खूप सोयीचे जाणार आहे.तेव्हा शेतकरी मित्रानो तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता.

मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान | शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रांनो चौथा उपघटक खूप खास आहे कारण अगोदरच्या काही घटकामध्ये इतर गोष्टी मिळणार आहेत मात्र चौत्या उपघटक नुसार मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान या ठिकाणी मित्रांनो दिल्या जाणार आहे त्यामुळे हि शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल.

मुरघास खरेदी करिता कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 7300 प्रति पशुपालक प्रति वर्ष इतके अनुदान या उपघटकांतर्गत दिले जाणार आहे.सोबतच मित्रांनो या ठिकाणी पाचवा उपघटकामधे टी एम आर टोटल मिक्स रेशन वापरासाठी दोन दुधाळ पशुधनासाठी प्रोत्साहन पर 33% अनुदान या ठिकाणी शेतकर्याना दिले जर आहे.

मित्रांनो टी एम आर खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान म्हणजेच या ठिकाणी 60 हजार रुपये प्रति पशु पालक प्रति वर्ष इतके या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो सहावा उपघटक आहे खनिज मिश्रण वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान मित्रांनो या ठिकाणी खनिज मिश्रण खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 600 रुपये प्रति दुधाळ पशुधन प्रतिवर्ष अनुदान दिले जाणार आहेत.

एकरी ५१ क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी Amrut Pattern cotton लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती

सोयाबीन सुधारित वाण | soybean biyane | soybean new variety

soybean new variety 2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

soybean new variety मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये आता खरीप हंगाम 2023 ला सुरुवात होणार आहे. तुम्ही मोबाईल वर, टीव्ही वर किंवा वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या हवामान विभागाचे अंदाज देखील पाहिले असतील. मान्सून 10 ते 15 जून पर्यंत संपूर्ण भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रकारचा म्हणजे सरासरी 90% मानसून यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला भेटणार आहे.

त्यामुळे ही आनंदाची वार्ता आहे. आता आपल्याला लगबगिने खरीप हंगाम 2023 च्या पूर्व तयारीला लागणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की,यंदाच्या खरीप हंगामामध्ये आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. यासाठी माते परीक्षण करा. माती परीक्षण च्या रिपोर्टवरच्या आधारे ठरवा की आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक येऊ शकतात.

या ५ पैकी पेरणीनंतर लगेच कोणताही एक तणनाशक वापरा-सोयाबीन पीकात एकही तन निघणार नाही

या खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन हे पीक लावणार असाल तर एक प्रश तुमच्या मनात आला असेल की सोयाबीन पिकाच नेमकं कोणतं वाण यंदाच्या हंगामात आपण पेरलं पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आम्ही देणार आहोत. मार्केटमध्ये हे टॉप 5 सोयाबीन पिकाची वाण आहेत. त्यांच्या विशेषता आपण पाहणार आहोत. त्याचे उत्पादन आपण पाहणार आहोत आणि त्यांचे शिफारस देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर सोयाबीन लावणार असाल तर खास करून तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

KDS ९९२ फुले दुर्वा सर्वात जास्त उत्पादन देणार वाण | soybean Top variety 2023

soybean best variety 2023 :- सध्या शेतकऱ्याची पसंती असलेलं व सर्वात जास्त उत्पन्न देणार वाण म्हणून हे वाण प्रचलित आहे.या वाणाला फुले दुर्वा तसेच काही शेतकरी KDS-९९२ असे या वाणाला म्हणतात.तांबेरा रोगास तसेच जिवाणूजन्य ठिपके इत्यादी रोगांना हा वाण प्रतिकारक आहे. याचा परिपक्वता कालावधी जर आपण पाहिला तर जवळजवळ 100 ते 105 दिवसांमध्ये हे वाण काढणीला येते .हार्वेस्टरने तुम्ही याची काढणी सहजपणे करू शकता आणि खास करून या वाणामध्ये तेलाचे प्रमाण पाहिलं तर फुले ध्रुवा मध्ये तुम्हाला १८.२ % तेलाची मात्रा त्या ठिकाणी मिळू शकतात.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1KDS- 992 (फुले दुर्वा) 2021100 ते 105 दिवस1)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम
2) मोठ्या आकाराचे  दाणे

फुले संगम (के डी एस 726)  | FULE SANGAM KDS-726 SOYBEAN VARIETY

soybean variety 2023:-तिसरा नंबर येतो ते म्हणजे फुले संगम या वाणाचा.या वाणाला ( fule sangam ) फुले संगम 726 या नावाने
शेतकरी ओळखतात.हे वाण १०५ ते १२० दिवसात काढायला येऊ शकतो आणि तेलाचा उतारा जर आपण पाहिला तर जवळजवळ 18 पूर्णांक 42 टक्के एवढा आहे त्यामुळे हे देखील तुम्हाला लागवडीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.या वाणाला ५ पाने आपल्याला पाहायला मिळतात.याचे उत्पन्न २५ ते ३२ क्विंटल हेक्टरी हपऊ शकते.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फुले संगम
(के डी एस 726) 
२०१६100 ते 105 दिवस1)तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण
2)खोडकूज,खोडमाशी किडीस,मूळकूज रोगास प्रतिकारक
3)दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा अधिक
२३ -२५ क्विंटल

ग्रीन गोल्ड 3344 सोयाबीन वाण | GREEN GOLD 3344 SOYABIN SEEDS

soybean top variety :-या वाणाचे नाव आहे ग्रीन गोल्ड 3344. हे सोयाबीन वाण देखील मोठ्या प्रमाणावर सध्या प्रचलित असून .खूप चांगलं उत्पादन शेतकर्याना मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो हे पानाचा पसारा कमी व निमुळते पान असलेले वाण आहे. याच कारणाने सूर्यप्रकाश शेवटपर्यंत पोहचत असल्यामुळे बुडापासून ते शेंडापर्यंत तुम्हाला शेंगा शेंगा या ठिकाणी दिसणार आहेत.तब्बल २० ते 25 टक्के शेंगा तुम्हाला चार दाण्याच्या दिसणार आहेत आणि कापणीत जरी उशीर झाला या वाणासाठी तरी देखील शेंगा न फुटणाऱ्या त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे वाण आहे.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1ग्रीन गोल्ड सोयाबीन 3344100 ते 105 दिवस1)कमी व निमुळते पान
2)बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा.
3) 30 टक्के शेंगा 4 दाण्यांच्या. 
4)काढणीला उशीर झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा
25 -30 क्विंटल

फुले किमया (के डी एस 753) | FULE KIMAYA KDS-753

हे वाण देखील फाऊल संगम प्रमाणेच अधिक उत्पादन देणारे आहे मात्र त्या वाणाच्या तुलनेत लवकर येणारे हे वाण आहे.या वाणाला फुले किमया म्हणजेच KDS -753 या नावाने शेतकरी ओळखतात. याचा परिपक्वता कालावधी शेतकरी मित्रांनो 95 ते 100 दिवसाचा आहे. तुम्ही पाहू शकता की अतिशय कमी कालावधीमध्ये निघणार हे पीक आहे. याचा कालावधी 95 ते 110 दिवसांचा आहे मात्र कापणी उशीर जरी झाला तरी त्याच्या शेंगा फुटत नाहीत.हे वाण शेंगा तडकण्यास सहनशील आहे असे म्हणता येईल. या वाणाचा तेलाचा उतारा 17 ते १९ टक्क्यांपर्यंत मिळू शकतो.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फुले किमया (के डी एस 753) 95 ते 100 दिवस1)तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो. 
2) दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
3)तेलाचा उतारा 18.25 %
क्विंटल

फले अग्रणी KDS-344 | FULE AGRANI KDS-344 soybean variety 2023

soybean new variety 2023 :-फुले अग्रणी ( FULE AGRANI ) या वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सोयाबीन फुले अग्रणी-३४४ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारे सन 2015 मध्ये प्रसारित करण्यात आलेली वान आहे. या वाणाची लागवड करत असताना मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम असते. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या फुले अग्रणी वानाची पेरणी किंवा लागवड ही जून महिन्याचा दुसरा पंधरवडा ते जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत करता येते या वाणाची पेरणी केल्यास प्रति एकरी २२ ते 25 किलो बियाणे लागते. या वाण्याचा पीक परिपक्वतेचा कालावधी 105 ते 110 दिवस असतो.योग्य नियोजनाने या वनाची लागवड केल्यास 25 ते 30 उत्पादन घेता येते. या वाणाची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म याविषयी बोलायचे झाल्यास दक्षिण महाराष्ट्र,तेलंगणा,आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक आणि तेलाचे प्रमाण 18.6% असणारे हे वान आहे.महाराष्ट्रासाठी तांबेरा प्रभावीत बागासाठी हेवान उत्तम आहे.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फले अग्रणी2013-2014१००-१०५ दिवस1)बक्टेररयल पुरळसाठी सहनशील. 2)महाराष्ट्र व मध्यभारतासाठी प्रसाररत.२२-२४ क्विंटल

मंडळी वाणाच्या संपूर्ण माहितीसाठी हा खालचा विडिओ नक्क्की बघा

👇👇👇👇👇👇👇👇


सोयाबीन चे हे वाण सर्वात फायदेशीर | टॉप सोयाबीन वाण | fule sangam | fule agrani | top soyabin